(रत्नागिरी)
16 वी रत्नागिरी जिल्हा ओपन चॅलेंज क्युरोगी व 10 वी पुमसे तायक्वांदो चॅम्पियनशिप सेवावृत्ती शिंदे गुरुजी सभागृह, नवभारत छात्रालय दापोली येथे दिनांक 25 ते 27 एप्रिल रोजी मोठ्या दिमाखात पार पडली.
जिल्हाभरातून तब्बल 600 खेळाडू या स्पर्धेसाठी दापोली येथे दाखल झाले होते. SRK तायक्वांदो क्लब मध्ये तायक्वांदोचे धडे घेणाऱ्या स्वरा साखळकर हिने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व या स्पर्धेत निर्माण केले. पुमसे प्रकारात सब ज्युनिअर कॅटेगरीमध्ये स्वरा हीने सुरुवातीलाच सुवर्ण पदकाला गवसणी घातली त्यानंतर सिंगल पुमसे मध्ये रौप्य पदक मिळवून आपल्या नावावर दुसऱ्या पदकाची नोंद केली. क्यूरोगी मध्ये सब जुनिअर गटामध्ये स्वरा हिने दुसरे सुवर्णपदक मिळविले. शेवटी झालेल्या कॅडेट गटामध्ये स्वरा हीने कांस्यपदक मिळवून आपल्या पदकांचा चौकार पूर्ण केला
या स्पर्धेसाठी स्वरा हीला SRK तायक्वांदो क्लबचे प्रशिक्षक शाहरुख शेख यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले, उत्तुंग अशी कामगिरी करणाऱ्या स्वरा हिचे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार आणि रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष श्री व्यंकटेश करारा, SRK तायक्वांदो क्लबचे उपाध्यक्ष श्री अमोल सावंत यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्वरा ही ल.ग. पटवर्धन शाळेची विद्यार्थिनी असून इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे. जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत चार पदके मिळवणाऱ्या स्वरा हिचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.