( रत्नागिरी )
पर्ससीन मच्छिमारांनवर शासनाने काही बंधन लावून नवीन कायदा केला आहे. त्या संदर्भात आज पर्ससीन मच्छिमारांनचा विराट असा मोर्चा मोर्चा मिरकरवाडा जेटीवरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लतीफ शेट महालदार, हनीफ महालदार, मेहबुब फडनाईक, सुहेल साखरकर, जाविद होडेकर, नासीर वाघू आदी नेते उपस्थित होते.
नवीन अभ्यास समितीने सर्व प्रकारच्या मासेमारीचा अभ्यास करावा, याकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी मिरकरवाडा जेटी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. पर्ससीननेट मच्छीमारांवर प्रत्येकवेळी अन्याय होत आहे, मागील पाच सहा वर्षांपासून अनेक बंधने पर्ससीननेट मच्छीमारांवर लादण्यात आली आहे. त्यामुळे आता या संदर्भात अभ्यास करणार्या समितीने सर्वच प्रकारच्या मच्छीमार नौकांच्या मासेमारीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा, असे या मच्छीमारांचे म्हणणे आहे. नवीन अभ्यास समितीने सर्वच प्रकारच्या मासेमारीचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे.
या विराट व ऐतिहासिक पर्ससीन मच्छिमारांच्या मोर्चाला मच्छीमारी संबंधित सर्व व्यवसाय, त्याच प्रमाणे लहान-मोठे दुकानदार, महिला मच्छीमारी व्यवसाय सोसायटी, टेम्पो,ट्रक व इतर लहान-मोठे मच्छी सप्लायर कंपनी, आईस प्लांट या सर्वांनी मोर्चाला आपला पाठिंबा दिला होता.