(गणपतीपुळे/वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदल विद्या मंदिर प्रशालेत राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यांमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रीय खेळाडूंची वेशभूषा परिधान केली होती.
तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थीनी कोलाज पद्धतीने राष्ट्रीय खेळाडूंची विविध चित्रे व माहिती एकत्रित करून चित्रे विविध पद्धतीने कोलाज करण्यात आली. तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यानी विविध प्रकारच्या प्राविण्य प्राप्त राष्ट्रीय खेळाडूंची आत्मचरित्र लेखन करण्यात आले. त्याचबरोबर नववी ते अकरावी च्या विद्यार्थ्यांसाठी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ईतर स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यानी बहुसंख्येने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभागाने केले होते. क्रीडाप्रमुख रणजित जाधव व सौ. मिथिला मोरे यांसह शाळेतील शिक्षकांचा संपूर्ण कार्यक्रमात मोलाचा सहभाग होता. शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती वराठे यांनी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पेड्डाना यांनी याप्रसंगी शुभेच्छा व्यक्त केल्या.