(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील जामगे सिमावाडी येथील बंद घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा उचपकवून घरामध्ये प्रवेश करत घरातील 13 हजाराची घरफोडी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात येथील पोलीसात नंबर 185 मध्ये भादवि 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कृष्णा शंकर जाधव (वय 65) यांनी येथील पोलीसात फिर्याद दाखल केली आहे. ही घटना दि 17 जून रोजी 2022 रोजी दुपारी 3 ते दि 18 जून 2022 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या मुदतीत घडली.
पोलीस कंट्रोल रूमकडून प्राप्त झालेल्या एफआरआय नुसार, फिर्यादी कृष्णा शंकर जाधव (रा जामगे सिमावाडी) यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी कोयंडा उचकवून घरातील सामान इतरत्र हलवून व कपाटातील रोकड रक्कम व सोन्याची नथ असा एकुण 13 हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची फिर्याद स्वतः कृष्णा शंकर जाधव यांनी येथील पोलीसात दाखल केली आहे.
ही घटना दि 17 जून रोजी 2022 रोजी दुपारी 3 ते दि 18 जून 2022 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या मुदतीत घडली. या घरफोडीचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.