(रत्नागिरी / वार्ताहर)
जाधव फिटनेस ॲकेडमीचे संचालक हेमंत जाधव व संचालिका साक्षी जाधव, सृष्टी जाधव, वाडँ क्र. 1 व 2 मधील रहिवासी व जिममेंबर यांनी उद्योग मंत्री उदय सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, निमेश नायर, स्मितल पावसकर मँडम, मार्गदर्शक बांबू म्हाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर व माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.
हेमंत जाधव यांनी यावेळी बोलताना, वॉर्ड क्र. 1 व 2 मधील वर्षानुवर्षे न झालेली कामे मार्गी लावण्यासाठी प्रवेश केल्याचे सांगितले. तसेच संघटनात्मक बांधणीत सामंतसाहेब जी जबाबदारी देतील ती घेऊन एकनिष्ठतेने, पुर्ण ताकदीने व सर्वतोपरी सहकार्य करण्याचा संकल्प केला असल्याचे सांगितले. तसेच स्थानिक लोकांच्या आर्थिक उन्नतीसाठी शिवसेनेच्या माध्यमातून आपण अनेक समाजपयोगी उपक्रम राबविणार असल्याचेही यावेळी स्पष्ट केले.