(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय, जाकादेवी या प्रशालेच्या या शैक्षणिक वर्षात जनरल सेक्रेटरीपदी बारावी सायन्समधील यश राजेश साळवी याची मुलांमधून जीएस निवड करण्यात आली. तर मुलींमधून दहावीतील अमिषा अतीन सावंत हिची निवड करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांना मंत्रिमंडळातील खाते वाटप करण्यात आले.यामध्ये प्रार्थना व शिस्त मंत्री -आर्य अभिषेक जोशी, क्रीडामंत्री -संकेत शांताराम कुळ्ये, सांस्कृतिक मंत्री -साक्षी कुमार नाईक,आरोग्यमंत्री- स्वर्णी रोहित कोळवणकर, स्वच्छता मंत्री -पार्थ प्रमोद वडके, पर्यावरण मंत्री- ईश्वरी रविंद्र जोयशी पाणीपुरवठा मंत्री -प्रतिक प्रवीण करंडे, सहल मंत्री- हरीश प्रकाश आखाडे तर जीएस पदी -यश राजेश साळवी मुलांमधून तर मुलींमधून अमिषा अतिन सावंत हिची निवड करण्यात आली.
या सर्व नवीन मंत्र्यांचे तसेच जीएस विद्यार्थी व विद्यार्थिनीचे प्रशालेचे मुख्याध्यापक नामदेव वाघमारे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, शिक्षक प्रतिनिधी राहुल यादव, शिवानंद गुरव, कलाध्यापक प्रणित जाधव, छायाचित्रकार अजिंक्य साळवी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्याला शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.