(जाकादेवी/ वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत तसेच माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त काव्यवाचनाचा विशेष कार्यक्रम घेण्यात आला.या काव्यवाचन कार्यक्रमात प्रशालेतील ४० विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे काव्यांचे सादरीकरण केले.
सदरचा कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक भूपाल शेंडगे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, उपप्रमुख शिवानंद गुरव, शिक्षक प्रतिनिधी शाम महाकाळ, संदीप कुराडे, अरुण कांबळे, योगेश चव्हाण, अमित बोले, मंदार रसाळ, संदेश सोनवडकर यांसह सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रशालेतील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या चाळीस विद्यार्थ्यांनी कवी केशवसुतांच्या तसेच इतर आवडत्या कविता, तर काहींनी स्वरचित कविता सादर केल्या. यावेळी प्रमुख व्याख्याते मराठी विषयाचे शिक्षक संतोष सनगरे यांनी कविवर्य केशवसुत यांच्या व इतर कवींच्या प्रभावी क्रांतिकारी कविता सादर करून कवी केशवसुत यांच्या समग्र साहित्यावर प्रभावीपणे भाष्य केले.काव्यवाचनाचे औचित्य साधून शिक्षक योगेश चव्हाण, अरूण कांबळे यांनीही सुंदर कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी अ वीरप्रतापसिंह पाटील यांनी केले. अध्यक्षीय विचार पर्यवेक्षक भूपाल शेंडगे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक संतोष पवार यांनी तर त्या आभार शिवानंद गुरव यांनी मानले.