( जाकादेवी/वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी शशिकांत सदाशिव लिंगायत ३८ वर्षे १० महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त झाल्याने त्यांना निवृत्तीप्रित्यर्थ शुभेच्छा समारंभ मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सचिव विनायक राऊत, कोषाध्यक्ष संदीप कदम, संचालक व जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील, संचालक विवेक परकर, सल्लागार विलास राणे, श्रीकांत मेहेंदळे, मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे सचिव रोहित मयेकर, जाकादेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक बिपीन परकर, मालगुंड विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव वाघमारे, डॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्लीचे मुख्याध्यापक आशिष घाग, मयेकर महाविद्यालयाच्या प्राचार्य स्नेहा पालये, वरिष्ठ लिपिक सुरेंद्र माचिवले, राईचे पोलीस पाटील व नवरात्र विल्ये परिसर उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश सावंत, पोचरी हायस्कूलचे मुख्याध्यापक पांडुरंग पानगले,विल्ये हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक कमलाकर हेदवकर, आगरनरळ विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक पांडुरंग धोंगडे, प्रकाश कांबळे, श्री.सौ लिंगायत, पर्यवेक्षक शेंडगे भूपाल शेंडगे, नितीन मोरे, शिक्षक प्रतिनिधी शाम महाकाळ,शिक्षकेतर कर्मचारी तालुका संघटनेचे विजय चव्हाण व संघटनेचे पदाधिकारी, शशिकांत लिंगायत यांचे नातलग यांसह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रारंभी संस्था व शाळेच्यावतीने चेअरमन सुनिल मयेकर यांच्या हस्ते शशिकांत लिंगायत व कुटुंबियांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. शशिकांत लिंगायत यांनी शाळा शिक्षण संस्थेच्या अनेक कामांत, उपक्रमात आपले मोठे योगदान दिले.प्रामाणिक व निष्ठेने सेवा केली.या त्यांच्या आदर्शवत कामगिरीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष बंधू मयेकर यांसह उपस्थित पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, मान्यवर , शालेय निवडक विद्यार्थी यांनी शशिकांत लिंगायत यांच्या सेवा काळातील अनेक उल्लेखनीय प्रसंग कथन करून कौतुक केले, भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी केले, सूत्रसंचलन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार,अरूण कांबळे यांनी तर आभार भूपाल शेंडगे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.
फोटो- जाकादेवी येथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी शशिकांत लिंगायत यांचा सेवानिवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार करताना चेअरमन सुनिल मयेकर, विनायक राऊत सोबत पदाधिकारी व मान्यवर (छाया-संतोष पवार-जाकादेवी)