(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील ज्ञानमंदिर विद्यालय आगरनळ मधील इंग्रजी विषयाचे सहाय्यक शिक्षक श्री. उत्तम रामचंद्र देशमुख व सौ. उज्वला उत्तम देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ.किरण देशमुख यांनी युरोपमधील जॉर्जिया देशातील’ Grigol Robakidze Medical University Tbilisi’ या विद्यापीठातून MBBS ही वैद्यकीय पदवी उच्च श्रेणीत डिसेंबर २०२२ मध्ये उत्तीर्ण केली.
भारतात आल्यानंतर अल्पावधीतच जानेवारी, 2023 मध्ये National Medical Council मार्फत घेतली जाणारी भारत सरकारची FMGE (परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा) ही उत्तीर्ण केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील डॉ.किरण देशमुख यांचे हे यश अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.