(जाकादेवी/ संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती,थोर शास्त्रज्ञ मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांचा जयंती दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
सदरचा कार्यक्रम प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते शिक्षक प्रतिनिधी व विज्ञान विषयाचे शिक्षक शाम महाकाळ यांनी मिसाईल मॅन डॉ. अब्दुल कलाम यांचे संशोधनातील महान कार्य व वाचनाचे महत्त्व विशद करून विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारची माहिती देऊन जयंती दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.अध्यक्षीय विचारातून बिपीन परकर यांनी डॉ.अब्दूल कलाम यांचा दिव्य संदेश, वाचनाचे मानवी जीवनातील महत्त्व आणि जागतिक हात धुवा या दिनाचे महत्त्व स्पष्ट करून विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
प्रारंभी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी केले. स्वागत शिवानंद गुरव यांनी तर आभार भूपाल शेंडगे यांनी मानले.