(जाकादेवी/संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रभावती मधुकर खेऊर सभागृहात मालगुंड शिक्षण संस्थेचे माजी खजिनदार व थोर देणगीदार कै. बाबाराम पर्शराम कदम यांच्या ७९ व्या जयंतीनिमित्त इ.१२ वी बोर्ड परीक्षेत विशेष गुणवत्ता संपादन केलेल्या आर्टस्- कॉमर्स-सायन्स या तिन्ही शाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षक व कर्मचारी यांना रोख रकमेची पारितोषिक देऊन गणपतीपुळे येथील उद्योजक संदीप कदम कुटुंबियांच्यावतीने संस्थेचे चेअरमन बंधू मयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गौरव करण्यात आला.
सदरचा कार्यक्रम मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान व धडाडीचे चेअरमन बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशालेमध्ये घेण्यात आल्या. यावेळी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सचिव विनायक राऊत, संस्थेचे खजिनदार संदीप कदम, संचालक व सी.ई.ओ.किशोर पाटील, संचालक विवेक परकर, श्रीकांत मेहेंदळे, सल्लागार नंदकुमार यादव, शाल्मली आंबुलकर, सुजाता पुनसकर, आर्य कदम, प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, शिवानंद गुरव, संदीप कुराडे, राहुल यादव, सुशांत लाकडे, मंदार रसाळ, अमित गवई, सुमेध बसणकर यांसह सर्व कॉलेजचे शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच पालक उपस्थित होते .
प्रारंभी बाबाराम कदम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कै.बाबाराम कदम यांच्या जयंतीचे औचित्य बाबाराम कदम यांचे सुपुत्र व उद्योजक संदीप कदम व त्यांचे कुटुंबीय यांच्यातर्फे बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शन शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ.शाल्मली आंबुलकर यांचा शिक्षण संस्थेतर्फे बंधू मयेकर यांनी सत्कार केला.
यावेळी किशोर पाटील, बिपीन परकर, ॲड. शाल्मली आंबुलकर, चेअरमन बंधू मयेकर इ. वक्त्यांनी दिवंगत बाबाराम कदम यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाबद्दल तसेच त्यांच्या आदर्श विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकून बाबाराम कदम यांच्या दातृत्वाचा व गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख करून त्यांच्या विचारांना वंदन करण्यात आले.गुणवंत विद्यार्थ्यांचे, पालकांचे,शिक्षकांचे अभिनंदन करून चेअरमन बंधू मयेकर यांनी संस्थेची ध्येय-धोरणे विशद केली. १००% निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे बंधू मयेकर यांनी भरभरून कौतुक केले. स्वागत- प्रास्ताविक मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी तर सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी मानले.