(नवी दिल्ली)
कुलगाममध्ये हादीगाम परिसरात भारतीय सैन्य दलाचे जवान आणि पोलिसांची दहशतवाद्यांसोबत चकमक उडाली. यावेळी, दोन दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून सैन्य दलाच्या जवानांनी मोठे यश मिळवले आहे.
पोलिसांनी आवाहन केल्यानंतर दोन्ही दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. या दोन दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. सैन्य दल आणि पोलिसांना स्पेशल इंटेलिजेंसकडून माहिती मिळाल्यानंतर जवानांनी ऑपरेशन सुरु केले. पोलिसांनी हादीगाम परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सैन्य दलाचे जवान आणि पोलिसांनी या परिसराला घेराव घातला.
जून २०२२ मध्ये जवानांनी १३० दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या दरम्यानच्या काळात २० स्थानिक नागरिक आणि १९ जवान शहीद झाले आहेत.