( नवी दिल्ली )
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो यांचे निधन झाले. आज सकाळी त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. गोळी झाडल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता, यासोबतच त्यांना खूप रक्तही वाहलं होतं. शिंजो आबे यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते, परंतु डॉक्टरांना यात यश आले नाही. शिंगे आबे यांना गोळ्या घालणारा मारेकरी पकडला गेला आहे. हल्ल्यानंतर लगेचच त्याला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले.
जीव घेण्याच्या उद्देशाने हल्लेखोर आले होते.
संशयित मारेकऱ्याचे वक्तव्यही समोर आले आहे. जपानी पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने सांगितले की त्याला शिंजो आबेला मारायचे आहे कारण तो शिंजोशी अनेक गोष्टींवर समाधानी नव्हता. सध्या जपानमध्ये सकाळपासूनच खळबळ उडाली असून सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे.माजी पंतप्रधान जपानच्या नारा शहरात प्रचार करत असताना जपानमध्ये ही घटना घडली. रविवारी येथे वरिष्ठ सभागृहाची निवडणूक होणार आहे.
शिंजो आबे यांच्या भाषणादरम्यान हल्लेखोराने दोन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी आबांच्या छातीतून गेली. तर दुसरी त्यांच्या गळ्यावर लागली. यानंतर ते जागेवरच पडले आणि आजूबाजूला चेंगराचेंगरी झाली. दरम्यान, शिंजोलाही हृदयविकाराचा झटका आला. यानंतर घटनास्थळी सीपीआर देऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर त्यांना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांना वाचवता आले नाही. शिंजो आबे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण जपानमध्ये शोकाचे वातावरण आहे. यावर बोलताना पीएम फुमियो किशिदाही भावूक झाले.