(बोगोटा)
ईरानच्या अफशीन एस्माईल गदरजादेहची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची जगातील सगळ्यात लहान व्यक्ती म्हणून नोंद करण्यात आली आहे. अफशीनची लांबी फक्त २ फूट १.६८ इंच एवढी आहे. अफशीनची उंची एकूण तीन वेळा मोजण्यात आली. त्यानंतरच त्याला जगातील सगळ्यात लहान व्यक्तीचा किताब दिला गेला. अफशीनच्या आधी सगळ्यात लहान व्यक्ती म्हणून कोलंबियाच्या बोगोटामधील एडवर्ड नीनो हर्नांडेज नावाच्या व्यक्तीची लांबी २ फूट ४.३८ इंच एवढी होती.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, २० वर्षीय अफशीन एस्माईल घादरजादेहचा जन्म ईरानच्या पश्चिम अजरबैजान प्रांतातील बुकान काउंटीमधील एका गावात झाला होता. त्याचे वजन सध्या ६.५ किलो आहे. त्याचे जीवन कायम हलाखीचे होते. अफशीनचे कुटुंब फार हलाखीचे जीवन जगत असून दैनंदिन जेवणासाठी त्यांना फार मेहनत घ्यावी लागते.
अफशीनने मुलाखतीदरम्यान म्हटले की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा भाग असणं हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखे होते. हा माझ्यासाठी फार मोठा चमत्कार आहे. पुढे तो म्हणतो, मला लोकांकडून मिळणारे अटेंशन आवडते. ते मला मी स्पेशल असल्याची जाणीव करून देतात. अफशीन कधीच शाळेत गेला नाही. मात्र तो अलीकडेच स्वत:चे नाव लिहायला शिकला आहे. त्याच्या कुटुंबियांसाठी त्याने सक्षम व्हावे असे त्याच्या कुटुंबियांचे स्वप्न होते. त्यामुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून त्याला संपूर्ण जग ओळखेल तर मला त्यांची मदत होईल असे त्याला वाटे. त्याचे ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे.