(संगलट -खेड /प्रतिनिधी)
देशातील उद्योजकतेला चालना देण्याच्या आणि त्यांना विकासाच्या मार्गावर नेण्याच्या उद्देशाने बडा बिझनेस प्रा. द्वारे बिलियनेअर्स ब्लूप्रिंट नावाचा उपक्रम सुरू केला जात आहे. त्या अंतर्गत दि.२३ व २४ सप्टेंबर २०२३ रोजी दिल्ली येथील मा. श्रीमती इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे अनेक सेलिब्रिटी यांच्यासह पंचवीस हजार पेक्षा जास्त व्यवसायिक यांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठा उद्योजकता लॉन्चपॅड कार्यक्रम होणार आहे. या उपक्रमामध्ये सहभागींना देशातील आणि जगातील नामांकित अब्जाधीश आणि अव्वल उद्योगपती स्वतः च्या अनुभवातून कौशल्य शिकवतील, अशी माहिती व्यवसाय सल्लागार व ज्येष्ठ पत्रकार अनुज जोशी यांनी दिली. खेड येथील मोफत व्यवसाय मारगदर्शन व सल्ला केंद्रात आयोजित डिप्लोमा इन इंटरप्रीनियर्शिप या अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी ज्ञानदीप शिक्षण संस्था अध्यक्ष अरविंद तोडकरी, उद्योजक शमशुद्दिन मुकादम, रोटरी शिक्षण संस्थाध्यक्ष बिपिन पाटणे, उद्योजक श्रीकांत कदम आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डिप्लोमा इन इंटरप्रीनियर्शिप या अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी श्री जोशी म्हणाले, दिल्ली येथे काही दिवसांपूर्वीच भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी, भारताचे सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, बॉलीवूड अभिनेता उद्योजक विवेक ओबेरॉय, अध्यात्मिक आणि प्रेरक वक्ता जया किशोरी, जी एलए आणि ट्रीवाल विद्यापीठाचे प्रतिनिधी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित बिलियनेअर्स ब्लूप्रिंट या कार्यक्रमाचा आरंभ झाला. बिलियनेअर्स ब्लूप्रिंट कार्यक्रमाद्वारे, सहभागींना देशातील यशस्वी व्यावसायिक जे उद्योग क्षेत्रात नेतृत्व करत आहेत त्यांच्याकडून व्यवसाय कौशल्य, व्यवसाय चालवण्याचे बारकावे शिकण्याची सुवर्ण संधी मिळेल.
भारताला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याच्या उद्देशाने देशातील आघाडीची व्यवसाय प्रशिक्षण संस्था असलेल्या बडा बिझनेसने GLA विद्यापीठाच्या सहकार्याने आपला नवीन डिप्लोमा सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा डिप्लोमा कोर्स डॉ. विवेक बिंद्रा, संस्थापक आणि सीईओ बडा बिझनेस यांच्या दूरगामी स्वप्नांच्या पूर्ततेच्या अनुषंगाने आरंभ केला जात आहे, जो आगामी काळात देशातील उद्योजकतेला एक नवीन आयाम देईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग दुप्पट करेल.
या डिप्लोमा कोर्सची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सहभागींना आयएम, हार्वर्ड, ऑक्सफर्ड, वॉटसन यांसारख्या परदेशी विद्यापीठांमध्ये ज्या भारतीय उद्योजकांच्या व्यवसायिक मॉडेल्स शिकवले जातात त्यांच्याकडून थेट शिकण्याची संधी मिळणार आहे. या विशिष्ट अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्षाचा असेल जो दोन सेमिस्टरमध्ये पूर्ण केला जाईल आणि प्रत्येक सेमिस्टरमध्ये व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे विषय जसे – स्टार्टअपची कल्पना कुठून येते? कल्पनेचे ग्राउंड रिअॅलिटीमध्ये रूपांतर कसे करावे? स्टार्टअप पुढे कसे न्यावे? कडे लक्ष वेधले आहे. हा डिप्लोमा कोर्स खास अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इच्छुकांसाठी तयार करण्यात आला आहे.
या डिप्लोमा दरम्यान, सहभागींना अल्फ्रेड ब्रश फोर्ड (फोर्ड मोटर कंपनी), आर एस सोधी, अध्यक्ष (इंडियन डेअरी असोसिएशन) राजेश मेहता (मालक आणि कार्यकारी अध्यक्ष – राजेश एक्सपोर्ट्स), रितेश अग्रवाल (डॉ. अग्रवाल), डॉ. ए वेलुमणी (संस्थापक- थायरोकेअर), आचार्य बाळकृष्ण (MD, पतंजली), रिधम देसाई (MD-मॉर्गन स्टॅनले इंडिया) आणि रमेश अग्रवाल (अध्यक्ष AMPL) यांसारख्या 80 हून अधिक अब्जाधीश आणि यशस्वी उद्योगपतींकडून शिकण्याची संधी मिळेल. तसेच याच उपक्रमाचा भाग म्हणून देशात उद्योजकीय वातावरण निर्माण करण्यासाठी सुमारे २५ हजार लहान मोठ्या व्यावसायिकांच्या उपस्थितीत दि.२३ व २४ सप्टेंबर २०२३ रोजी भव्य उद्योजकता लॉन्चपॅड हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाची माहिती खेड येथील बिझनेस हेल्प सेंटर मधून सर्वांना मोफत देण्यात येईल. तसेच जे लोक ऑनलाईन पद्धतीने एक तास देऊन डिप्लोमा कोर्स ची माहिती घेतील त्यांना ८ हजार रुपये किमतीचा एक कोर्स मोफत देण्यात येणार आहे. कोकणातील देखील व्यावसायिक, विद्यार्थी व उद्योजक यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री अनुज जोशी यांनी केले.
फोटो : खेड: येथील बिझनेस हेल्प सेंटर मध्ये डिप्लोमा इन इंटरप्रीनियर्शिप या अभ्यासक्रमाचे उद्घाटन करताना मान्यवर.