(संगलट -खेड / इकबाल जमादार )
खेड शहरामधून वाहणाऱ्या जगबुडी नदीमध्ये एका मगरीचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी दुपारी सुमारे सहा फूट लांबीची ही भली मोठी मगर मृत अवस्थेत खेड शहरातील नदीकिनारी असलेल्या बाबा मलंग दर्गापासून काही अंतरावर आढळून आली व ती तशी तरंगताना पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास सदरची मृत मगर अनेकांनी पाहिली. या ठिकाणी यापूर्वी अनेक मगरी मरून मृत्यू झाल्या आहेत. मात्र या ठिकाणी कशामुळे मगरीचा मृत्यू होत आहे ही बाब अद्याप कुणाच्याही लक्षात येत नसल्याचे समजते. याबाबत प्रशासन गंभीररित्या दखल घेणे गरजेचे आहे व याबाबत चौकशी करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमीतून केली जात आहे.