(रत्नागिरी / प्रतिनिधी)
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी व जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने व नंदादीप आय केअर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने जिल्हा पोलीस मुख्यालय येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून नेत्र तपासणी शिबीर नुकतेच संपन्न झाले.
यावेळी एकूण १२१ पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदविला. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष सुनिल धावडे, सचिव समीर गोताड, संघटक समीर धावडे, सदस्य चंद्रकांत गोताड, नंदादीप आयकेअर हॉस्पिटलकडून अक्षय विलणकर, ओमकार शिंदे, नूर अमिन, प्रिया मोंडे व पूर्वा मयेकर यावेळी उपस्थित होते.