(डिजि टेक)
UPI मुळे भारतीयांचं आयुष्य मोठ्या प्रमाणावर बदललं आहे. लोक आता रोखीऐवजी स्मार्टफोनचा वापर करून थेट बँक अकाऊंट्समधून पैसे ट्रांसफर करतात. UPI सिस्टम सुरक्षित आहे परंतु तरीही यात अनेकदा समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा पैसे डेबिट झाल्यानंतर ट्रँजॅक्शन अडकतं किंवा लोक UPI फ्रॉडला बळी पडतात. कधी कधी तर चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे जातात.
भारतीय युपीआयवरून पैसे पाठवण्याआधी समोरच्याचा नंबर घेतात, त्याला ‘hi’ पाठवतात आणि नंतर एक रुपया पाठवून कन्फर्म करतात. एवढी काळजी घेऊन तसेच युपीआयमध्ये सेफ्टी फीचर्स असून देखील चुका होतात. युजर घाई घाईत चुकीच्या फोन नंबर किंवा QR कोडवर पैसे पाठवतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला पैसे जायला हवे त्याला जात नाहीत आणि चुकीच्या अकाऊंटवर गेलेले पैसे पुन्हा कसे मिळवायचे हे अनेकांना माहित देखील नसतं. परंतु यावर काही उपाय आहेत.
UPI अॅप सपोर्टचा वापर करा
RBI च्या गाईडलाइन्सनुसार, युजरने सर्वप्रथम पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरकडे चुकीचं ट्रँजॅक्शन रिपोर्ट केला पाहिजे. GPay, Phone पे Paytm किंवा UPI अॅपच्या कस्टमर केयर सपोर्ट द्वारे ट्रँजॅक्शन रिपोर्ट करावं. ग्राहकांना सहकार्य करण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडे सिस्टम आहेत. तुम्ही तुमची समस्या फ्लॅग करू शकता आणि रिफंडची मागणी करू शकता.
NPCI पोर्टलवर नोंदवा तक्रार
जर UPI अॅपच्या कस्टमर्स सर्व्हिसकडून जास्त मदत मिळाली नाही, तर तुम्ही NPCI पोर्टलवर देखील तक्रार करू शकता. यासाठी…
- NPCI च्या ऑफिशियल वेबसाइट npci.org.in वर जा.
- त्यानंतर ‘What we do tab’ वर क्लिक करा
- त्यानंतर UPI वर टॅप करा
- मग Dispute Redressal Mechanism सिलेक्ट करा
- कम्प्लेंट सेक्शन मध्ये UPI ट्रँजॅक्शन आयडी, व्हर्च्युअल पेमेंट अॅड्रेस, ट्रांसफर केलेली अमाउंट, ट्रँजॅक्शन डेट, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरसह तुम्ही सर्व ट्रँजॅक्शन डिटेल द्या.
- कम्प्लेंटचे कारण ‘Incorrectly transferred to another account’ निवडा.
- तुमची तक्रार सबमिट करा.
बँकेशी संपर्क करा
अजूनही जर तुमच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नसेल तर तुम्ही पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर बँक आणि त्यानंतर बँक (जिथे रिसिव्हर कस्टमरचे अकाऊंट असेल) कडे तक्रार PSP अॅप/TPAP अॅपवर पाठवू शकता.