(चिपळूण)
बहादूरशेख नाका येथील उड्डाणपूल कोसळल्यानंतर आक्रमक होत रास्ता रोको केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रमुख पदाधिकाऱ्यांसह ६० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांचाही समावेश आहे. उड्डाणपूल कोसळल्यानंतर कामथे येथील ईगल इन्फ्रा कंपनीच्या कार्यालयासह राष्ट्रीय महामार्ग कार्यालयावरही राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी धडक दिली. अधिकारी चर्चेला येत नसल्याच्या कारणास्तव बहादूरशेख नाका येथे महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको करण्यात आला.
याप्रकरणी नितीन ऊर्फ अबू ठसाळे, मयूर खेतले, रियाज खेरटकर, मनोज जाधव, उदय ओतारी, किशोर रेडीज, दशरथ दाभोळकर, रमेश राणे, नीलेश कदम, बरकत पाते, दिलावर खेरटकर, रोहन नलावडे, अजिंक्य आंब्रे, राकेश दाभोळकर, वरुण गुढेकर, संदीप जागुष्टे, किसन चिपळूणकर, तन्वीर खेरटकर, डॉ. राकेश चाळके, गणेश भुरण, स्वप्नील शिंदे या पदाधिकाऱ्यांसह सुमारे ५० ते ६० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक कानोज करत आहेत.