(चिपळूण / ओंकार रेळेकर)
चिपळूण मध्ये सर्वात आधी ज्यांनी स्वामिल व्यवसायाच्या माध्यमातून मुहूर्तमेढ रोवली असे ज्येष्ठ स्वामिल व्यावसायिक माननं उर्फ बबनभाई हरजी पटेल यांचे सोमवार दि.१३ नोव्हेंबर रोजी पहाटे गोवळकोट रोड अंबिका नगर येथे राहत्या घरी वृद्धकाळाने निधन झाले.
शांत, संयमी, मनमिळावू स्वभावाने चिपळूणमध्ये सर्वांना परिचित असलेले बबनभाई पटेल यांनी चिपळूण मध्ये सुमारे ५५ वर्षापूर्वी चिपळूण शहरातील गोवळकोट रोड येथे महाराष्ट्र स्वामिल या नावाने लाकूड व्यवसायासह स्वामिल व्यवसाय सुरू केला. त्यांचे अंबिकानगर येथील राहत्या घरी निधन झाले. मुत्यू समयी त्यांचे वय ८९ वर्ष होते. कष्टाळू आणि आपल्या व्यवसायात पारंगत असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी तर पाच मुले सहा मुली अशी नातवंडे आहेत.ज्येष्ठ चिरंजीव मोहन बबनभाई पटेल हे आपल्या वडिलोपार्जित महाराष्ट्र स्वामिल हा व्यवसाय अनेक वर्षे यशस्वीरीत्या चालवत आहेत. तर दुसरा मुलगा प्रवीण बबनभाई पटेल हे कविता डेव्हलपर्स, पटेल उद्योग समूह या नावाने चिपळूण मध्ये व्यवसाय करतात. त्यांची मुलगी सविता गोपाळ पटेल या कच्छ भुज गुजराथ येथे असतात.
बुधवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी त्यांची दशक्रिया विधी असून गुरुवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी बारावी विधी अंबिका नगर येथील राहत्या घरी होणार आहे.