चिपळूण शहरातील वाशिष्टी नदीवरील मुरादपूर पेठमाप पुलासाठी आमदार शेखर निकम यांनी तब्बल १२ कोटी निधी मंजुर करून आश्वासनपूर्ती केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. सदरचा पूल गेली अनेक वर्षे या ना त्या कारणांनी प्रलंबित राहिला होता. मात्र शेखर निकम आमदार झाल्यावर कारकिर्दीच्या पहिल्याच वर्षी ह्या पुलासाठी कोरोनाचा बिकट काळ असताना देखील सात कोटी मंजूर करून आणले. मात्र एवढया रक्कमेत पूल होणे अवघड असल्याने उर्वरित पाच कोटी निधी शेखर सरांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्याने प्राप्त केला आहे. नगरपालिकांना वैशिष्टयपूर्ण कामांसाठी विशेष ठोक निधी अंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे. तशा प्रकारचे मंजुरीचे पत्र नुकतेच आमदार निकम यांना प्राप्त झाल्याने या पुलाचा प्रश्न आता मार्गी लागल्याने सदरचा पूल लवकरच अस्तित्वात येणार आहे.
या पुलामुळे शहरात अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी बऱ्याच अंशी कमी होऊन पूर्णपणे बाहेरील मार्गाने जाण्यास मदत होणार आहे.तसेच मुरादपूर, पेठमाप ,फरशी ,गोवळकोट आदी भागातील स्थानिक नागरिकांप्रमाणेच गुहागर, खेड तसेच पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनधारकांना हा मार्ग सुलभ वेळेची व इंधनाची बचत करणारा ठरणार आहे.यामुळे आमदार शेखर निकम यांचे नागरिकांतून आभार मानले जात आहेत.