(चिपळूण)
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा १० मे रोजी जन्मदिन असतो. हा दिवस वंचितचे कार्यकर्ते, पदाधिकारी, हिंतचिंतक स्वाभिमान दिन म्हणून साजरा करतात. दरवर्षी प्रमाणं या वर्षीही रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ॲड प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा केला गेला.
चिपळूण तालुक्यातील वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकऱ्यांकडून चिपळूणच्या रुग्णालयात रुग्णांना फळ, बिस्कीट वाटप करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा निरीक्षक स्मिता गवाळे, शारदा चंदनशिवे, वंदना पांडे, सविता मोहिते, रिया सावंत, दीपिका सावंत, DBJ कॉलेजचे प्राचार्य गवाळे, प्राचार्य पांडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष जाधव , सुमेध जाधव, विलास मोहिते आदी उपस्थित होते.