(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण तालुक्यातील काविळतळी येथे एका 30 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऋतुजा रुपेश पालशेतकर (30, काविळतळी, साईशा अपार्टमेंट, चिपळूण) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा पालशेतकर या राहत्या घरी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आल्या. घरच्यांनी त्यांना कामथे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.