(चिपळूण / प्रतिनिधी)
चिपळूण य कमीतालुक्यातील दोणवली येथे दोन ठिकाणच्या सौरउर्जेच्या बॅटर्यांची चोरी झाल्याची घटना 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद मंदार मधुकर चांदिवडे (36, दोणवली, शिर्केवाडी, चिपळूण) यांनी पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोणवली पवारवाडी येथील शाळेजवळील 1 सौर बॅटरी तसेच बौध्दवाडी स्टॉपजवळील 1 बॅटरी अशा दोन सौरउर्जेच्या 10 हजार रुपयांच्या बॅटर्या अज्ञाताने चोरल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.
यापूर्वी ही चिपळूणात सौर उर्जा बॅटर्या चोरीची घटना घडली होती. यामध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. केतकी भागणेवाडी येथील पाकाडीजवळ एसटी स्टॉपच्या बाजूला असलेल्या सौरउर्जेच्या बॅटर्या चोरणार्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये किशोर पांडुरंग सावंत (52, काविळतळी, चिपळूण), सलीम युसुफ शहा (52, काविळतळी, चिपळूण) अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतची फिर्याद रिया राजेंद्र गोंधळी (42, केतकी, साळीवाडा, चिपळूण) यांनी पोलीस स्थानकात दिली होती. त्यावेळी 24 हजार 599 रुपयांच्या 3 सोलार बॅटर्या चोरीस गेल्या होत्या.