( चिपळूण / प्रतिनिधी )
चिपळुणातील मापारी मोहल्ला येथील घर फोडून 65 हजारांचे दागिने चोरीस गेल्याची घटना 29 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. या चोरीप्रकरणी येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहेब समीर सय्यद (30, मापारी मोहल्ला, पटेल प्लाझा, चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद झिनत समदानी परबुलकर (34, चिपळूण येथे भाडयाने, मूळ दापोली ) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी झिनत परबुलकर यांच्या मिस्टरांच्या मावशीच्या रुमवर कपाटातील लॉकरमध्ये दागिने ठेवलेले होते. या कपाटाचे लॉकर उचकटून त्यातील 35 हजार रुपयांचे दीड तोळे वजनाची सोन्याची चेन, 12 हजार रुपये किंमीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील जोड, 18 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन अंगठया असा एकूण 65 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी जुहेब समीर सय्यद याच्यावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.