(चिपळूण/ प्रतिनिधी)
कामथे येथील कंपनीच्या कॅम्पमध्ये असलेल्या स्वींग सेंटर कंपनीमध्ये बुमपे्रशर मशिनच्या रिमोट कंट्रोलची चोरी झाल्याची घटना 26 मे रोजी घडली होती. वॉचमन व कंपनीतील कर्मचारी यांची नजर चुकवून अडीच लाखांच्या रिमोट कंट्रोलची चोरी झाली होती. याबाबतची फिर्याद जयंतीलाल घेवरचंद नोनेचा (49, नाशिक, सध्या रा. चिपळूण) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
नोनेचा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मध्यप्रदेश येथील विजयपाल छोटेलाल पाल (23) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर भादविकलम 381 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.