( चिपळूण / प्रतिनिधी )
तालुक्यातील वालोपे वरचीवाडी सिमेवर गवळाची डाग येथे एका अनोळखी तरुणाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. त्याचे वय अंदाजे ४०-४५ वर्षे असून टॉवेलसारख्या कपड्याने गळफास घेतलेल्या स्थितीत जंगलमय भागात दिसून आला.
ही घटना ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.