( चिपळूण / प्रतिनिधी )
चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने गुरुवार दि.२१।०७।२०२२ रोजी चिपळूण नगरपरिषद येथे काही विषया अंतर्गत मुख्याधिकारी यांची राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले. यामध्ये चिपळूण नगरपरिषद हद्दीतील रखडलेले प्रकल्प सुरू करण्याबाबत तसेच रॉयल नगर डीपी रोड रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत व मच्छी व्यावसायिक व छोटे व्यावसायिक त्यांच्या समस्या अशा अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.
दरम्यान प्रलंबित विषयातून नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयी दूर व्हाव्यात या आशयाचे निवेदन ही देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हा युवक अध्यक्ष योगेश शिर्के,मा.नगरसेवक व चिपळूण तालुका व्यापार व उद्योग सेलचे तालुकाध्यक्ष किशोर रेडीज,शहर उपाध्यक्ष खालिद दाभोलकर,महिला शहराध्यक्षा दीपिका कोतवडेकर,युवती शहराध्यक्षा जान्हवी फाेडकर मा.नगरसेवक शहर सचिव मनोज जाधव,युवा नेते उदय ओतारी,युवक शहराध्यक्ष सिद्धेश लाड,सोशल मिडीया तालुकाध्यक्ष सचिन साडविलकर आदी उपस्थित होते.