(चिपळूण)
सामाजिक क्षेत्रात थोर कार्य केलेले, इतिहासाचे नामवंत अभ्यासक-संशोधक आणि पुराणवस्तू संग्राहक अण्णा शिरगावकर यांचे नुकतेच (मंगळवार, दि. ११) हृदयविकाराने शहरातील अपरांत हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
कोकण इतिहास संशोधन क्षेत्रात थोर कार्य करणाऱ्या अण्णा शिरगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ‘लोटिस्मा’च्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात ‘शोकसभा’ आयोजित करण्यात आली आहे. अण्णा हे जिल्हा परिषदेचे सभापती होते.
दापोली तालुक्यातील दाभोळ येथे मच्छिमार आणि भोई समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सागरपुत्र विद्यार्थी वसतिगृह सुरु केले होते. नऊ ताम्रपट, विविध राजकीय काळातील असंख्य नाणी, मूर्ती, भांडी यांचा मोठा संग्रह त्यांनी जमवला होता. या शोकसभेला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लोटिस्माचे कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.