(चिपळूण)
पंचायत समितीच्या माजी सदस्य सुनिता सुनील तटकरे यांच्या पत्नी आणि कोंढे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या सुनिता सुनील तटकरे (५२) यांचा विद्युतभारित वाहिनीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. शनिवारी कोंढे माळवाडी येथील स्मशानभूमीत कै. तटकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुनिता तटकरे या सायंकाळी ७ वा. च्या सुमारास भांडी घासण्यासाठी घराच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडखाली बसल्या होत्या. याचवेळी उंदराने कुरतडलेल्या विद्युतभारीत वाहिनीचा त्या पत्र्याच्या शेडला स्पर्श होऊन सुनिता तटकरे यांना विजेचा जोरदार झटका बसला. त्यांना शॉक लागल्याचे समजताच पती, नातेवाईक व आजुबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना उपचारासाठी चिपळुणातील एका खासगी रूग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासले असता त्या मृत झाल्याचे सांगितले. घटनेचा पोलिसांमार्फत पंचनामा करण्यात आला आहे. त्यांच्या निधनाबद्दल कोंढे पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे