(चिपळूण)
जालन्यातील आंतरवली सराठी येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना आंदोलन करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांवर अचानक अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक महिला भगिनी, बंधु जखमी झाले. या कृत्याचा जाहिर निषेध व्यक्त करण्यासाठी चिपळूण मध्ये सकल मराठा क्रांती मोर्चा तर्फे जाहिर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
या निषेध मोर्चाला पाठिंबा दर्शवण्यासाठी रविवार (दि.3 सप्टेंबर रोजी) चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री.नितीन(अबुशेठ) ठसाळे यांनी दिले. यावेळी श्री.सतीश कदम, श्री.सतीश मोरे, श्री.गणेश भुरण, श्री.रुपेश इंगवले व सर्व भगिनी उपस्थित होत्या.