(चिपळूण)
चिपळुणातील शिवनदीत मगरींचा वावर वाढला आहे. भरदिवसा या मगरी काठावर येण्याचा प्रयत्न करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरालगत वाहणाऱ्या शिव आणि वाशिष्ठी नदीतील मगरी आता शहरातील रस्त्यांवर मुक्त संचार करू लागल्या आहेत. वनविभागाकडून या मगरींचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.