( चिपळूण )
चिपळूण तालुक्यातील अलोरे येथील जुन्या मोडकळीस आलेल्या रुममध्ये कुजलेल्या स्थितीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. ही घटना 27 मार्च रोजी दुपारी 2 वा. च्या सुमारास समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलोरे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सिद्दिक निजामुद्दीन मुल्लाजी (47, अलोरे, चिपळूण) हे दुपारी 2 वा. च्या सुमारास जुन्या मोडकळीस आलेल्या कॉलनीजवळून जात असताना त्यांना काहीतरी कुजल्याचा वास आला. त्यांनी तिथे जावून पाहिले असता एका पुरुषाचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत दिसून आला. याबाबतची खबर सिद्दिक निजामुद्दीन मुल्लाजी यांनी शिरगाव पोलीस स्थानकात दिली.
या अज्ञात मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृताची उंची साधारण 6 फुट 6 इंच, पिवळसर रंगाचा चेक्स फुल शर्ट, चॉकलेटी रंगाची फुल पॅन्ट असे त्याचे वर्णन असून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.