(चिपळूण)
कराड-चिपळूण मार्गावरील सती येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडकीस आली. याप्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पूजा कल्पेश पवार (25, सती) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याबाबतची खबर कल्पेश अनंत पवार (30, सती) यांनी दिली. पूजा पवार या कुटुंबासह सती येथे रहात होत्या. गुरुवारी त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती कुटुंबाला समजताच त्यांना तत्काळ उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकऱ्यानी तपासून त्यांना मृत घोषित केले. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.