(किशोर पवार / कळझोंडी)
रत्नागिरी तालुक्यातील चाफेरी फाटा येथे घेण्यात आलेल्या लोकनेते शामराव पेजे चषक २०२४ स्पर्धेत अंतिम सामन्यात खंडाळा येथील आणा इलेव्हन क्रिकेट संघ अंतिम विजेता तर साईबाबा क्रिकेट कचरे संघाने उपविजेता ठरला, तसेच कै. रामदासभाई स्मृती इलेव्हन संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावला.
अंतिम विजेता याणा क्रिकेट संघाचे मालक संदीप कश्यप व सर्व संघातील खेळाडूला रोख रुपये पंधरा हजार एकशे सातचे पारितोषिक व आकर्षक चषक, उपविजेत्या साईबाबा कचरे संघाला रोख रुपये दहा हजार एकशे सातचे पारितोषिक व आकर्षक चषक, संघ मालक सतिश हळदणकर व सहभागी संघाला गौरविण्यात आले. तर कै.रामदास भाई स्मृती इलेव्हन कांबळे लावगण संघाला रोख रक्कम पाच हजार एकशे सातची रोख रक्कम व आकर्षित चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
लोकनेते शामराव पेजे शैक्षणिक, सामाजिक संघटना कुणबी समाज साडेबावीस खेडी संघटनेच्या वतीने लोकनेते शामराव पेजे यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून जयगड सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील, जि. प. माजी सदस्य रामभाऊ गराटे, सामाजिक कार्यकर्ते शरद चव्हाण, रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. मेघना पाष्टे, उंडीच्या पोलीस पाटील घवाळी, सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक शेखर भडसावळे, भालचंद्र डाफले, जयेश घवाळी ,तसेच साडेबावीस खेडी कुणबी समाज संघटना वाटद खंडाळा संघटनेचे अध्यक्ष संजय तथा पांडू शितप, आदी मान्यवर व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.