(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली गावातील भटाचा कोंड वाडी भागातील खचलेला डोंगर आणि त्याला पडलेल्या भेगा यांची पहाणी खासदार विनायक राऊत यानी रविवार दि.6 रोजी महसूल विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत केली. चाफवली भटाचा कोंड वाडी भागातील डोंगराला अतीवृष्टीमुळे मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे बावदाने आणि भोजे या दोन घराना मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच या वाडीतील इतर घरानाही कालांतराने धोका पोहचू शकतो त्याचीच पहाणी करण्यासाठी खा. विनायक राऊत यानी भेट दिली.
याबाबत महसूल विभागाचे अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. या वाडीतील लोकांच्या पुनर्वसनाचा आराखडा बनवण्याबाबत तहसिलदार अमृता साबळे यांच्याशी चर्चा केली. तसेच तालुक्यातील आणखी काही गावांची माहीती तयार करण्याचे सांगितले. तसा आराखडा तयार असल्याचे तहसीलदार अमृता साबळे यानी यावेळी सांगितले. काही राहिलेल्या गावांचे नावही घेण्याच्या सुचना खा. राऊत यानी केल्या. येत्या आठ दिवसात आपण जिल्हाधिकारयां समवेत या विषयी मिटिंग घेणार असल्याचेही खा. राऊत यांनी म्हटले. या लोकांच्या पुनर्वसनासाठी शासकीय जागा उपलप्ध आहे का याची ही चौकशी यावेळी खा. राऊत यांनी केली.
सदर वेळी खा.राऊत यांच्यासह प्रांत अधिकारी विजय सूर्यवंशी, संगमेश्वर तहशिलदार अमृता साबळे, नायब तहशिलदार सुरेश गोताड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, मा.जि. स. रजनी चिंगळे, वेदा फडके, माजी सभापती जयाशेठ माने, बापू शिंदे, तलाठी चव्हाण, ग्रामसेवक माईन पो.पा. विजय चाळके, उप सरपंच विजय घुमे, शिवसेनेचे विभाग प्रमुख मनोहर सुकम, उप विभाग प्र. प्रकाश चाळके, मा.उप सरपंच सुरेश चाळके, दिलीप मालप, संतोष गावडे, हरेश कांबळे गणपत केदरी, बुवा भालेकर, अमर चाळके, किरण चाळके उपस्थित होते.