(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील चवे गावच्या ग्रामसभेत चवे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या सौ. अनुराधा अशोक यादव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सौ.अनुराधा अशोक यादव यांनी यापूर्वी चवे गावात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. या कमिटीमध्ये गेले पंधरा वर्षे त्या महिला सदस्यपदी कार्यरत होत्या. ग्रामपंचायत चवे वार्ड सदस्यपदी तसेच महिला बचत गट ग्रामसंघ या संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. या सर्व कामांचा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे गावाने त्यांची महात्मा गांधी तंटामुक्त गाव कमिटीवर बिनविरोध अध्यक्षपदी निवड केली आहे.
भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा चवे व चवे ग्रामस्थांच्यावतीने सौ. अनुराधा अशोक यादव यांचे अभिनंदन केले.