(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास कीर वरिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना, आजीवन अध्ययन आणि विस्तार (डीएलएलएलई) विभाग, निवडणूक समिती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख हरेश केळकर, डीएलएलई विभागप्रमुख दिप्ती कदम, निवडणूक समिती विभाग प्रमुख राखी साळगावकर, विनय कलमकर, मिथिला वाडेकर उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
तसेच घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्केचिंग स्पर्धा घेण्यात आली. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव ,सांस्कृतिक विभागप्रमुख वैभव कीर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख हरेश केळकर उपस्थित होते.
तर घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत क्रीडा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ.वसुंधरा जाधव, क्रीडा विभाग प्रमुख वैभव घाणेकर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख हरेश केळकर उपस्थित होते.