रत्नागिरी : ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.
सामंत यांच्या हस्ते नानीज, पाली, खाणू, कापडगाव, कशेळी, खेडशी आदि गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले. दौऱ्यादरम्यान नाणीज येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हा परिषद सदस्य बापू म्हाप, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती परशुराम कदम आदी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामंत म्हणाले ग्रामीण भागात गावागावात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होत आहेत. विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.विकास कामे होत असतानाच येथील तरुणांना व्यवसाय, रोजगार मिळणे गरजेचे आहे. रत्नागिरीमध्ये शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालय सुरू झाला आहे. येथील तरुणांना नक्कीच त्याचा फायदा होईल. शिक्षण घेऊन येथील तरुणांनी आपण उद्योगधंदे,नोकरी करण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध केले पाहिजे. शैक्षणिक दृष्ट्या त्यांना सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आपण सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या संबंधित शासनाने जारी केलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
*विविध विकास कामांचे भूमिपूजन व उदघाट्न*
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या हस्ते नाणीज दीपक गुरव घर ते मारुती मंदिर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन, दिनेश रेवाळे चक्की ते दत्त मंदिर सरोदे वाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन, नाणीज चोरवणे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन, रत्नागिरी कोल्हापूर रस्ता ते कशेळी पोच मार्ग रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन, कशेळी लिवेकरवाडी कातळखळे रस्ता खडीकरण करणे कामाचे भूमिपूजन, खाणू कोल्हापूर रोड ते आठले वाडी ते कांचन चौक रस्ता कामाचे भूमिपूजन, पाली साठरे बांबर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे भूमिपूजन, पाली पाथरट येथे सार्वजनिक गणपती विसर्जन घाट बांधणे कामाचे भूमिपूजन, कापडगाव अनंत कानू पेजे शाळा क्रमांक 2 पर्यंतचा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन, कापडगाव मांडवकर वाडी ते गावदेऊळ कोठारवाडी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण या कामाचे भूमिपूजन, वेळवंड भायजेवाडी गावडेवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचे उद्घाटन, खेडशी फणसवळे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन आदि कामांचे भूमिपूजन व उद्घाटन झाले.