रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक गावातील नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत.आँनलाईन नोंदणी प्रक्रियेमधील अनभिज्ञता, लसीकरण केंद्रावरील लांबच लांब रांगा,आणि लसींचा तुडवडा यातून हजारो नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळाला नसल्याने जिल्हा प्रशासनाने याबाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने सर्वस्वी बाबा ढोल्ये, संजय पुनसकर श्रीनिवास दळवी,निलेश आखाडे,रघुनंदन भडेकर,आनंद विलणकर आदींनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.
लसीकरण सोबतच ग्रामीण भागातील अनेक गावांतील लोक सुरवाती पासूनच आपल्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घेत नसून वैद्यकीय उपचार घेण्यात दिरंगाई करीत असल्याने गावातील गाव कृती दलामार्फत याबाबत जागृती करण्यात यावी.आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न यशस्वी करावेत असे म्हटलं आहे.काही गावात तरुण वर्ग क्रिकेट सारखे खेळ अवलंबत असल्याने लॉकडाऊनच्या प्रयत्नांला खीळ बसत असून याकामी ग्रामीण स्तरावरील बीट अंमलदार यांना कारवाई करण्याचे अधिकार द्यावेत असेही समविचारीने या निवेदनात म्हटले आहे.