(मुंबई)
राज्यभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार काल सरासरी सुमारे ७४ टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी देखील मतदान पार पडले. आज सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून, आता मंगळवार, दि. २० डिसेंबर रोजी निवडणूक निकाल लागणार आहे. त्यामुळे आता मतदारांसह उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या, तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. या निवडणुकीत नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला. यामध्ये तरुणांसह वृद्धांनीही पुढे येऊन मोठ्या प्राणात मतदान केले.