( रत्नागिरी / प्रतिनिधी )
मॅन्ग्रोव्ह संवर्धनासाठी मॅन्ग्रोव्ह फाऊंडेशन तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय सर्वोत्तम परफॉरमिंग प्रोजेक्ट असोसिएटस (मत्स्य विभाग) चा पुरस्कार पेठकिल्ला कुरणवाडी येथील कुमार शुभम विकास भाटकर (27 वर्षे ) याला देण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
‘आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त मॅन्ग्रोव्ह इकोसिस्टमच्या संवर्धनासाठी’, मॅन्ग्रोव्ह फाऊंडेशन आणि मॅन्ग्रोव्ह सेल तर्फे मॅन्ग्रोव्ह फाऊंडेशन अवॉर्ड्स २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम 26 जुलै 2022 रोजी दुपारी 03:30 वाजता ठेवण्यात आला होता.
मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन पुरस्कार 2022 मध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणारे स्वयं-मदत गट, सर्वोत्तम कामगिरी करणारे वन अधिकारी, सर्वोत्तम कामगिरी करणारे उपजीविका विशेषज्ञ, सर्वोत्कृष्ट परफॉर्मिंग प्रोजेक्ट असोसिएट्स, असे पुरस्कार ठेवण्यात आले होते. यातील सर्वोत्कृष्ट परफॉर्मिंग प्रोजेक्ट असोसिएट्स म्हणून कु. शुभम भाटकर याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.