(मुंबई)
गोकुळ सेवा संस्था, तांबेडी (गवळवाडी) संचलित व गोकुळ युवा क्रिकेट क्लब ( मुंबई ) आयोजित शिवशाही चषक – २०२३ ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा युवा नेतृत्व व समाजसेवक सिद्धेश ब्रीद तसेच हिंगोली विधानसभा संपर्क प्रमुख संदीप भालेकर यांनी या आयोजित केली आहे. सदर स्पर्धा रविवार दि. २३ एप्रिल २०२३ होणार असून त्यासाठी प्रवेश फी ५५००/- ठेवण्यात आली आहे. सदर स्पर्धा सह्याद्री क्रिडा बोर्ड, सह्याद्री मैदान, रोड न. १२, टिळक नगर, चेंबूर (प) मुंबई येथे होणार आहेत.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५१,०००/- व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक २५,०००/- व आकर्षक चषक तसेच सामनावीर आकर्षक चषक अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेचे प्रक्षेपण यू ट्यूब लाईव्ह द्वारे करण्यात येणार आहे.
स्पर्धेत पहिल्या १६ संघांना खेळवले जाईल. सामने ४ षटकांचे खेळविले जातील. गोलंदाज (१-१-२) प्रत्येक संघाने सामना सुरु होण्याच्या १५ मि. अगोदर उपस्थित रहावे. न राहिल्यास समोरच्या संघाना बाय दिले जाईल. सामना जिंकण्यासाठी चेस करणे बंधनकारक असेल. पंचाचा निर्णय अंतिम राहिल. प्रत्येक संघाकडुन १ वेळेस बॉल फी १००/-₹ आकारली जाईल तसेच असे स्पर्धेसाठी नियम व अटी ठेवण्यात आले आहेत. खेळाडुला खेळताना दुखापत झाल्यास आयोजकांकडुन फक्त प्रथमोपचार केले जातील. एक खेळाडू एकाच संघाकडून खेळविला जाईल. स्पर्धेत फेरबदल करण्यास अधिकार कमिटीकडे राहील, असे नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी राजाराम कांबळे – ८३५६९८१४२१, संकेश भालेकर – ९३७२३७७४३६. प्रशांत केळस्कर -७०२१८३१८६२ यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.