कोल्हापूर जिल्ह्यात आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे सत्ताधारी कोण असणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणी सुरू असून निकालाचे कल आता हाती येत आहे. विरोधी गटाने विजयाचा गुलाल उधळला आहे. दोन उमेदवार विजयी झाले आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघासाठी 2 तारखेला मोठ्या चुरशीने गोकुळ दूध संघासाठी मतदान झालं होतं. त्यानंतर आज या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. सत्ताधारी गटाकडून शाहू पॅनलखाली उमेदवार मैदानात आहे. तर विरोधी गटाकडून शाहू शेतकरी पॅनल उभं करण्यात आलं आहे. सुरुवातीपासून विरोधी गटाने आघाडीवर आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीत देखील सतेज पाटील गटाचे पाचही उमेदवार आघाडीवर आहे. विरोधी गटाने विजयाचं खातं उघडलं आहे. विरोधी गटातील सुजित मिनचेकर 346 मतांनी विजयी झाले आहे. तर अमर पाटील 436 मतांनी विजय मिळवला आहे.