(पाटपन्हाळे / वार्ताहर )
शासनाने गॅस सिलेंडर वितरणातील त्रुटी, बोगस गॅस सिलेंडर कनेक्शन यांचा शोध घेऊन गॅस वितरणात अधिकाधिक सुसुत्रीकरण आण्यासाठी गॅस सिलेंडर धारकांनी ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यासाठी शासनाकडून ३१ डिसेंबर ही अंतिम तारिख देण्यात आली आहे. त्यामुळे गुहागर व शृंगारतळी येथे गॅस एजन्सीमध्ये ई केवायसी अपडेटसाठी एकच झुंबड उडाली आहे.
वयोरुद्ध नागरिकांचे ठसे अपडेट करण्यात तांत्रिक अडचण येत आहेत. त्यासाठी पुन्हा शंभर रुपये खर्च करावा लागत आहे. तसेच वेळही वाया जाता आहे. भर उन्हात महिला व वृध्द यांना रांग लावावी लागत असून त्यामुळे परवड होत आहे. तरी प्रशासन व गॅस एजन्सी धारकांनी अशा प्रकारे ई केवायसी अपडेटसाठी ग्रामीण भागात शिबीरांचे आयोजन करावे किंवा मुदत वाढवून मिळावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.