(संगलट-खेड/इक्बाल जमादार)
श्री दत्तमंदिर स्वानंद सुखनिवासी तपोनिधी गणेशनाथ महाराज सेवा मंडळाचे सेक्रेटरी तसेच श्रीदत्तदिगंबर सहकारी गृहनिर्माण संस्था, खेड तालुक्यातील किंजळे गावचे रहिवासी तानाजी एकनाथ निकम यांना गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, बँकिंग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळातर्फे दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा समजला जाणारा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाला आहे.
विजेत्या पुरस्काराचे मानकरी श्री निकम यांना दिनांक १९-०४-२०२२ रोजी गिरणी कामगार क्रिडा भवन, मुंबई येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे होते. कामगार मंत्री ना. श्री. हसन मुश्रीफ, कामगार राज्यमंत्री ना.श्री.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडु, खासदार श्री. राहुल शेवाळे, आमदार श्री. कालीदास कोलंबकर, कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल, विकास आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, कामगार आयुक्त श्री. सुरेश जाधव, कल्याण आयुक्त श्री. रविराज इळवे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या निवडीने गावापासून ते मुंबईपर्यंत अनेक मान्यवरांनी त्यांचेवर अभिनंदनांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीकरीता त्यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.