ऑस्ट्रेलियाने बुधवारी दिल्लीत नेदरलँड्सवर ३०९ धावांनी विक्रमी विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे गुणतालिकेतील स्थान बदलले नाही. परंतु, त्यांच्या रनरेटमध्ये खूप सुधारणा झाली आहे. ऑस्ट्रेलियाने पाच पैकी तीन सामने जिंकले आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ६ गुणांसह (+१.१४२) गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर नेदरलँड्सचा संघ गुणतालिकेत तळाशी पोहोचला आहे. नेदरलँड्सने पाच पैकी एक सामना जिंकला आहे. नेदरलँड्सचे २ गुण (-१.९०२) आहेत.
आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ अपराजीत आहे. भारतीय संघ १० गुणांसह (+१.३५३) गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. या विश्वचषकात एकही सामना न गमावलेला भारत एकमेव संघ आहे.
दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत पाच पैकी चार सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ ८ गुणांसह (+२. ३७०) गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या गुणतालिकेत न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचे ८ गुण आहेत. न्यूझीलंडने पाच पैकी चार सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडचा नेट रनरेट (+१.४८१) इतका आहे.
पाकिस्तानच्या संघाने सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर त्यांना पुढील सलग तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानचे चार गुण (-४००) आहेत. गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानच्या संघाने सुरुवातीचे तीन सामने गमावल्यानंतर पुढील दोन सामन्यात विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानचे चार गुण (-०.९६९) आहेत. गुणतालिकेत अफगाणिस्तानचा संघ सहाव्या क्रमांकावर आहे.
या स्पर्धेत श्रीलंकेच्या संघाने आतापर्यंत निराशाजनक कामगिरी करून दाखवली. श्रीलंकेला चार पैकी एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यांच्या खात्यात २ गुण (-१.०४८) आहेत. गतविजेत्या इंग्लंडला त्यांच्या चार पैकी तीन सामन्यात पराभव पत्कारावा लागला. इंग्लंडचे २ गुण (-१.२४८) आहेत. बांगलादेशने त्यांच्या पहिल्या 5 सामन्यात एकूण एकमेव सामना जिंकला आहे. बांगलादेशच्या खात्यात २ गुण (-१२५३) आहेत.