(संगमेश्वर)
गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत फाल्गुनी फेपडे हिने पहिला क्रमांक पटकावला आहे.
गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या संकल्पनेतून अध्यक्ष उदय गोताड, उपाध्यक्ष राहुल यादव, मंगेश धावडे व डॉक्टर मंगेश कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी गाव विकास समितीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हास्तरीय छत्रपती संभाजी महाराज निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. यंदाचे स्पर्धेचे सहावे वर्ष होते. या स्पर्धेत कोकण साठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज आणि कोकणातील दरवर्षीची पूरस्थिती, नैसर्गिक आपत्ती आणि उपाययोजना काळाची गरज हे विषय स्पर्धकांना देण्यात आले होते.
सदर निबंध स्पर्धेसाठी एकूण 50 हून अधिक निबंध आले. त्यातून दोन विजेते व पाच उत्तेजनार्थ स्पर्धक निवडण्यात आले. यात प्रथम क्रमांक – फाल्गुनी संतोष फेपडे कनिष्ठ महाविद्यालय, बुरंबी शिवने, द्वितीय क्रमांक – ऐश्वर्या दिनेश शिंदे खोरनिनको,लांजा, उत्तेजनार्थ- १) गौरी दिलीप शिवगण आठल्ये, सप्रे,पित्रे महाविद्यालय, देवरुख, २) श्वेता संतोष गमरे पिरंदवणे, ३) प्रेरणा रविंद्र करंबेळे,न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा, ४) सुहास तानाजी गेल्ये शिवने, तेऱ्ये, ५) दिप्ती संजय सावंत,कला आणि वाणिज्य महाविद्यालय, साखरपा यांचा समावेश आहे.
प्रथम विजेत्याला 3333 रुपये रोख व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांकास 2222 रुपये रोख व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ विजेत्यास रुपये 1000 रोख व सन्मान चिन्ह असे बक्षीस देण्यात येणार आहे.24 डिसेंबर रोजी देवरुख येथे या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला असल्याची माहिती गाव विकास समितीच्या महिला अध्यक्षा सौ दीक्षा खंडागळे यांनी दिली आहे.