( राजापूर )
डुक्कर किंवा अन्य वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी ठेवलेला गावठी बॉम्ब खाल्ल्याने बैलाचा जबडा फाटल्याची घटना ६ जानेवारी रोजी तालुक्यातील निवेली येथे घडली होती. यामध्ये निवेली येथील प्रकाश घाणेकर यांचा बैल जखमी झाला होता . याप्रकरणी प्रकाश घाणेकर यांनी नाटे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी अणसुरे येथील संशयीत आरोपी कृष्णा उर्फ नाना विष्णू कणेरी (४७) व अमोल बाळकृष्ण नाचणेकर ( ३७ ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती.
याप्रकरणी न्यायालयात १६ जानेवारी रोजी सुनावणी झाली. दोन संशयीत आरोपींची रत्नागिरी न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रूपयांच्या वैयक्तिक जामिनावर मुक्तता केली आहे.