(चिपळूण)
गावठी दारू विक्रीचे हल्ली गावागावात पेव फुटलेले दिसत आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या गावात पोलीस कारवाई होताना दिसत आहे. अशाच एका प्रकारात गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री केल्याप्रकरणी नांदगाव गोसावीवाडी येथील महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेकडून दारूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई २० मार्च रोजी सायंकाळी ७:२५ वाजता करण्यात आली. याप्रकरणी सावर्डे पोलिस स्थानकाच्या महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल नीता गमरे यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार नांदगाव गावातील एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेने गोसावीवाडी येथील राहत्या घराच्या पडवीत गावठी दारूचा साठा केला होता. तेथून ती दारूची विक्री करीत होती. घटनास्थळी पोलिसांनी दारूचे ग्लासही जप्त केले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.